BBM - पारडं कॅप्टन्सीचे कार्य : मीराला गमवावं लागणार... | पुढारी

BBM - पारडं कॅप्टन्सीचे कार्य : मीराला गमवावं लागणार...

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. कारण घरामध्ये रंगणार आहे पारडं कॅप्टन्सीचे हे कॅप्टन्सी कार्य ! ज्यामध्ये पणाला लागणार आहेत सदस्यांच्या काही गोष्टी. जय किंवा विशाल या दोघांमध्ये रंगणार आहे हे कॅप्टन्सी कार्य. घरातील सदस्यांना ठरवायचे आहे बिग बॉस यांनी सांगितलेल्या गोष्ट ते जय – विशालपैकी कोणासाठी गमावण्यास तयार आहेत. घरातील सदस्य हे करण्यास नकार देखील देऊ शकतात. पारडं कॅप्टन्सीचे कार्य यामध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार जय आणि विशाल यामध्ये कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

आज बिग बॉस मीराला सांगणार आहेत, कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन करण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. त्या आहेत आपल्याकडील soft toy म्हणजेच अप्पू आणि दुसरी गोष्ट स्टोररूममध्ये ठेवली आहे. आणि या दोन्ही वस्तू आपल्याला पूर्णत: नष्ट करायच्या आहेत.

उत्कर्ष मीराला समजावताना दिसणार आहे. कठीण प्रश्न कठीण प्लेयरला पडतात. आपण त्याची उत्तरं काढायची. As a player तू कशी आहेस बर्‍याचश्या गोष्टींनी दाखवून दिलंस ना टास्कमध्ये.

मीरा म्हणाली मला झोप नाही येणार… उत्कर्ष म्हणाला, आम्ही गोष्टी सांगणार ना कॉमेडी आणि फालतूवाल्या.

बघूया मीरा त्याग करेल का ? आणि कोणसाठी करेल ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button