पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीतील अभिनेता कुंद्रा जॉनी यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. (Kundara Johny) त्यांच्या पार्थिवावर १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सेंट अँथनी चर्च, कांजिराकोडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Kundara Johny)
संबंधित बातम्या –
कुंद्रा जॉनी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट दिले केले. नित्या वसंत चित्रपटातून त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीत प्रेवश केला होता. गॉडफादर, इन्स्पेक्टर बलराम, अवनाझी, राविंते माकन, ओरु सीबीआय डायरी कुरिप्पू, किरीडोम, ओरू वदक्कन वीरगाथा, समोहम या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. शिवाय, वर्णपाकिटू, आराम थंपुरन, चेंकोल या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.