पुढारी ऑनलाईन : आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता, सुपरस्टार थलपती विजय याचा जबरदस्त ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'थूपाकी' २५ सप्टेंबरला चाहत्याच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे.
'थूपाकी' या चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते, जो आपली ड्यूटी संपवून घरी सुट्टीसाठी परतला आहे. सुट्टीच्या काळात त्याच्या पोलिस मित्रासोबत फिरत असताना, एक दहशतवादी टोळी जी मुंबई शहराला उद्ध्वस्त करू पाहत आहे, त्याची त्याला चाहूल लागते. पुढे जे काही होतं ते दिग्दर्शक मुरगुडूस यांनी विलक्षण मांडले असून विजयने सैनिकाची उल्लेखनीय भूमिका साकारली आहे. यामुळे चाहत्यांना थलपतीला पुन्हा चित्रपटात पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा :