पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ आनंदचा यांच्या आगामी चित्रपट 'फायटर' चित्रपटाची. फायटरमध्ये काय नवीन बघायला मिळणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. यात एक धमाल पार्टी साँग बघायला मिळणार आहे. (Fighter Movie) सिद्धार्थ आनंद मुंबईतील एका स्टुडिओमध्ये बहुप्रतीक्षित पार्टी अँथम गाण्याचे शूटिंग करणार असल्याचं कळतंय. या गाण्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे "फायटर"ची संपूर्ण टीम यात दिसणार आहे. कलाकार या लाईव्ह गाण्यात दिसणार असून हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पदुकोण, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय आणि इतर कलाकार या गाण्यात आहेत. (Fighter Movie)
हाय-एनर्जी पार्टी गाण्यानंतर दिग्दर्शक आणखी दोन गाण्यांचे चित्रीकरण करण्यास सज्ज झाला आहे. ज्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण या करिश्माई जोडीचा समावेश आहे. सिद्धार्थ आनंद हे नेहमीच उत्कृष्ट संगीतासह हिट चित्रपट देण्यासाठी ओळखले जातात. विशाल-शेखर यांनी हे गाणं तयार केलं असून बॉस्को मार्टिसच्या नृत्यदिग्दर्शनाद्वारे हे गाणं जीवंत केल आहे. सिद्धार्थ आनंदच्या चित्रपटांमध्ये "झूम जो पठाण," "घुंगरू," "जय जय शिवशंकर," "बँग बँग," "बचना ए हसियोनो," आणि या सारख्या धमाकेदार गाण्याचा समावेश आहे.
फायटर स्टार हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिका करत आहेत. आगामी टप्प्यात चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्सवर काम सुरू होणार आहे, जे ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे आणि सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांनी त्यांच्या बॅनरखाली Marflix Pictures सोबत Viacom18 Studios सोबत निर्मिती केली आहे आणि २५ जानेवारी २०१४ रोजी रिलीज होणार आहे.