अमिताभ बच्चन यांचे ‘भारत माता की जय’, ट्विट होतेय व्हायरल

amitabh bachchan
amitabh bachchan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या विशेष अधिवेशनात घटनेतून 'इंडिया' हे नाव हटवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विटमध्ये असे काही संकेत दिले आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी G20 परिषदेच्या एका कार्यक्रमात 'भारताचे राष्ट्रपती' असे 'भारताचे राष्ट्रपती' असे लिहिल्याचे म्‍हटलं केला आहे. नुकतेच सत्ताधारी भाजपच्‍या काही नेत्यांनीही 'इंडिया' हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असल्याचे सांगून ते काढून टाकण्याचे आवाहन केले होते. याचदरम्यान अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे शहंशहा अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत भारत माता की जय असे ट्विट केले आहे.

G20 च्या रात्रीच्या भोजनावेळी निमंत्रण पत्रिकेवर 'भारत' उल्लेख

मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रपती भवनने 9 सप्टेंबरला जी 20 डिनरसाठी जे निमंत्रण पत्र फाटवलं आहे, तेदेखील 'भारत के राष्ट्रपती' ('President of Bharat') नावाने पाठवले आहे. आतापर्यंत President of India असा प्रयोग केला जायचा. याविषयी काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी X (ट्विट) करून माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, 'तर हे वृत्त खरचं सत्य आहे… राष्ट्रपती भवनने 9 सप्टेंबर रोजी G20 रात्री भोजनासाठी 'President of India' ऐवजी 'भारत के राष्ट्रपती' नावाने निमंत्रण पाठवलं आहे. त्याची पुष्टी करत निमंत्रण पत्राचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हे निमंत्रण एक मंत्रीच्या नावावर आले आहे. यावर 'भारत के राष्ट्रपती' असा उल्लेख आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news