पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलुगु चित्रपट दिग्दर्शक एएस रवी कुमार एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्राला (Mannara Chopra Kissing Controversy) किस करताना दिसतात. विशेष म्हणजे, संपूर्ण मीडियासमोर रवी कुमार यांनी मन्नाराला गालावर किस केलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिग्दर्शकाला ट्रोल करण्यात आले. पण, यानंतर दिग्दर्शकाने स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय, मन्नारा काय म्हणाली पाहा. (Mannara Chopra Kissing Controversy)
प्रियांका चोप्राची चुलत बहिण मन्नारा चोप्राने या किसिंग वादावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने चित्रपट दिग्दर्शक एएस रवी कुमार चौधरी यांचा बचाव करत त्यांची बाजू घेतलीय. तिने म्हटलं की, दिग्दर्शकाच्या किस करण्यामागील हेतू चुकीचा नव्हता.
मन्नारा चोप्राचा पुढील चित्रपट 'थिरागबदरा सामी' साठी एका प्रमोशन कार्यक्रमात दिग्दर्शक एएस रवि कुमार चौधरी उपस्थित होते. यावेळी सोबत असलेली अभिनेत्री मन्नारा चोप्राच्या गालावर त्यांनी किस केले. यावेळी हे क्षण कॅमेराबद्ध झाले आणि व्हायरल झाले.
चित्रपट दिग्दर्शकाने अचानक केलेल्या या प्रकारामुळे मन्नारा खूप आश्चर्यचकित आणि चिंतेत दिसली. या घटनेचा फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर दिग्दर्शकाला खूप ट्रोल करण्यात आले. काही लोकांनी हा प्रमोशनचा फंडा अशल्याचे म्हटले तर काहींनी म्हटले की, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर हसू तर दिसत आहे. पण, ती अस्वस्थ वाटत आहे.
रिपोर्टनुसार, या प्रकारानंतर ए एस रवी कुमार यांनी खुलासा केला की, मन्नारा त्यांच्या मुलीसारखी आहे आणि त्यांनी तिला स्नेहपूर्वक किस केलं होतं. मन्नारा चित्रपटांमध्ये प्रामाणिकपणे काम करते, खूप मेहनत करते, यासाठी ते मन्नाराचे ऋणी आहेत. हे दाखवण्यासाठी किस केलं होतं. दिग्दर्शकाने दावा केला की, या प्रकारामुळे अभिनेत्रीला किंवा त्यांच्या पत्नीला आक्षेप नाही .