पुढारी ऑनलाईन डेस्क : पठाणच्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'फायटर' साठी चर्चेत आहेत. (Fighter Movie) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक सध्या बहुप्रतीक्षित एरियल अॅक्शन चित्रपटासाठी पार्टी अँथमवर काम करत आहेत आणि याच शूटिंग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचं समजतंय. (Fighter Movie)
प्रॉडक्शनच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला की, "सिद्धार्थ आनंदच्या चित्रपटांमध्ये उत्तम संगीत आणि पार्टी गाणे आहेत. मग ते अंजाना अंजानी असो घुंगरू असो किंवा पठाण असो. फायटर यापेक्षा वेगळे असणार आहे. चित्रपटाची टीम सध्या एका गाण्यावर काम करत आहे. मुंबईतील एका भव्य सेटवर या गाण्याचं खास चित्रीकरण केले जाईल.
हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर आणि बाकीचे कलाकार सध्या गाण्याची तयारी आणि तालीम करत आहेत आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शूटिंग सुरू होणार आहे." सलाम नमस्ते, बचना ए हसीनो, अंजाना अंजानी, बँग बँग, घुंगरू, झूम जो पठान आणि इतर अनेक सारख्या चार्ट-टॉपर्ससह सिद्धार्थ आनंदने त्याच्या चित्रपटांमधील संगीत नेहमीच चर्चेत राहील आहे. पुन्हा एकदा, बॉलीवूडमधील मोस्ट वॉन्टेड मॅन आणखी एका पार्टी गाण्याने आपल्याला आश्चर्यचकित करणार यात शंका नाही.
सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत. या स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेल्या "स्पिरिट ऑफ फायटर" या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळाली आणि प्रत्येकजण २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.