इंडियन आइडल : १२ व्या सीजिनमधून आषीश कुलकर्णी बाहेर 

इंडियन आइडल  १२ व्या सीजिनमधून आषीश कुलकर्णी बाहेर
इंडियन आइडल १२ व्या सीजिनमधून आषीश कुलकर्णी बाहेर
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : इंडियन आइडल १२ व्या सीजिनमधून आशीष कुलकर्णी नुकताच बाहेर पडलेला आहे. कमी वोट मिळल्यामुळे इंडियन आइडल १२ व्या सीजिनमधून आशीष कुलकर्णी याने पहिल्या ६ मध्ये आपली जागा बनवू शकला नाही.

इंडियन आइडल १२ व्या सीजिनमध्ये 'आशा भोसले स्पेशल' या थीमवर परफाॅर्मेंसनंतर अनु मलिक यांनी सांगितले की, यावेळी निकाल पूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात आहे. निर्णय जनता करणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर सर्व कंटेस्टेंट्सनंतर मंचावर बोलविण्यात आलं होतं.

सर्वात पहिल्यांदा सर्वात जास्त वोट कंटेस्टेंट्स अनु मलिक यांनी जाहीर केलं. या निकालात सर्वात जास्त वोट अरुणिता कांजीलाल हिला मिळाले. त्यामुळे ती  १२ व्या सीजिनमध्ये सुरक्षित राहिली. अरुणितानंतर कमी वोट मिळालेल्या कंटेस्टेंट्सचे नावं घोषीत करण्यात आली.

इंडियन आइडल : १२ व्या सीजिनमधून आषीश कुलकर्णी बाहेर
इंडियन आइडल : १२ व्या सीजिनमधून आषीश कुलकर्णी बाहेर

आशीष कुलकर्णाीचा प्रवास संपला

जनतेने सर्वात कमी वोट दिल्यामुळे आशीष कुलकर्णीचा इंडियन आइडलमधील प्रवास संपला आहे. ज्यावेळी शोमधून आशीष बाहेर पडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याची मानलेली बहीण शण्मुखप्रिया रडू लागली. व्हिडीओ स्क्रिनच्या माध्यमातून आशीषच्या आठवणी दाखविण्यात आल्या. आशीष कुलकर्णीपूर्वी महाराष्ट्रातील अंजली गायकवाड हिदेखील शोमधून बाहेर पडलेली होती.

हे आहेत ६ टाॅप गायक 

आशीष कुलकर्णी शोमधून बाहेर पडल्यानंतर इंडियन आइडलमध्ये ६ टाॅप गायक मिळाले. उत्तरखंडचा पवनदीप राजन, महाराष्ट्राची सायली कांबळे, बंगळुरूचा निहाल, हैदराबादची शण्मुखप्रिया, कोलकात्याची अरुणिता कांजीलाल हे टाॅप ६ कंटेस्टेंट्स आहेत. या ६ मधून एक जण  इंडियन आइडल १२ व्या सीजिनची ट्राॅफी जिंकणार हे स्पष्ट झालेले आहे.

व्हिडीओ पहा : शेवतांसाठी १२ किलो वजन वाढवावं लागली होतं

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news