पुढारी ऑनलाईन डेस्क : दादर अभिमान गीताच्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दूसरा म्युझिक व्हिडिओ "तूच मोरया" हा नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. विशालचे हे ४० वे गाणे आहे तर आपल्या सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकरचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडिओ आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाले ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा अनोख्या पद्धतीने साक्षात्कार होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण देऊन जातो. अशी या गीताची संकल्पना असल्याचे प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर ह्यांनी सांगितले. प्रणिल आर्ट्स ह्या संस्थेचे हे दुसरे पुष्प असून ह्या गाण्याचे गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रणिल हातिसकर ह्यांनी एक हाती बजावली आहे.