पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार-पंकज त्रिपाठी (Akshay Kumar-Pankaj Tripathi) यांच्या 'ओएमजी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. परमेश्वर आणि भक्ताच्या नात्यावर आधारित हा चित्रपट आहे. (OMG 2 Trailer ) २०१२ मध्ये ओएमजी चित्रपट रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा 'ओएमजी -२' सीक्वल आहे. आता ११ वर्षांनंतर सीक्वलमधून नव्या कलाकारांसोबत वापसी करत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (OMG 2 Trailer)
ओएमजी २ चा ट्रेलरच्या सुरुवातीला शिव भगवानच्या संवादाने होते. नंदीला आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठी एक दूत पाठवण्यासाठी म्हणतात. त्यानंतर भक्त पंकज त्रिपाठीची एंट्री होते.
ट्रेलर खूप दमदार आहे. ट्रेलरमध्ये यामी गौतम वकीलच्या भूमिकेत दिसत आहे. तर अरुण गोयल प्रिन्सिपलच्या भूमिकेत आहेत. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्रामवर ट्रेलर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं- सुरू करा स्वागताची तयारी…११ ऑगस्टला येत आहे डमरूधारी.
'ओएमजी २' चा टीजर पाहिल्यानंतर प्रेक्षक दोन गटात विभागले गेले होते. सोशल मीडियावर काही लोक खूप कौतुक करत आहेत. तर काही प्रेक्षकांनी टीजरच्या काही सीन्सचा विरोध केला होता.