पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरल स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) आपल्या दमदार अदाकारी आणि चित्रपटांमुळे चर्चेत राहते. 'द केरल स्टोरी'नंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तिचे फॅन फॉलोइंगदेखील मोठे आहे. आता ती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळतेय. (Adah Sharma)
अदा शर्माला फूड ॲलर्जी आणि डायरियामुळे रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या ती डॉक्टर्सच्या देखरेखीखाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी चित्रपट 'कमांडो'च्या प्रोमोशन्सआधी तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीनंतर निदान झालं की, तिला डायरिया आणि फूड ॲलर्जी झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार, 'काल सकाळी ती डायरियाने त्रस्त होती.'
अदा लवकरच चित्रपट 'कमांडो'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिला पाहण्यात आलं होतं. अदा पुन्हा एकदा पोलिस अधिकारी भावना रेड्डीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कमांडो' नवा ॲक्शन-थ्रिलर वेब सीरीज आहे, यामध्ये अदा शर्मासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता प्रेम दिसणार आहे.