Happy Birthday Manish Paul : एकेकाळी नोकर होता मनीष, टीव्हीचा नंबर वन होस्ट कसा बनला?
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता असो, होस्ट असो, कॉमेडियन असो वा गायक, मनीष पॉलची ओळख अनेक गुणांनी होते. पण, तो स्वत:ला केवळ एक एंटरटेनर म्हणवतो. (Happy Birthday Manish Paul ) आज टीव्हीचा नंबर वन होस्ट मनीष पॉल आहे. पण, एकवेळ अशी होती की, त्याच्याकडे कुठलेही काम नव्हते. तो घराघरामध्ये नोकर म्हणून काम करायचा. जीवन जगताना संघर्ष केला. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करायला, तो प्रयत्न करत राहिला. एक दिवस असा आला की, टीव्ही जगतातील तो नंबर वन होस्ट बनला. (Happy Birthday Manish Paul)
शाळेपासून सूत्रसंचालनाची सुरुवात
मनीष पॉलचा जन्म ३ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये झाला. त्याने एपीजे पब्लिक स्कूल, पुढे कॉलेज ऑफ वोकेश्नल स्टडीजमधून शिक्षण घेतले. त्याला शालेय जीवनापासून होस्टिंग आणि ॲक्टिंगची आवड होती. जेव्हा शाळेत कधी टेप बंद पडायचा, तेव्हा मनीष स्टेज सांभाळायचा. महाविद्यालयीन शिक्षण संपवून मनीष मुंबईमध्ये आपल्या आजीकडे परतला.
सुरुवातीला करावा लागला संघर्ष
सुरुवातीला दिवसाच्या त्याला खूप संघर्ष करावा लागला. मनीषला टीव्ही मालिकेत काम करायचं होतं. पण, त्याला रेडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तो आरजे बनला. त्यानंतर तो टीव्ही मालिकाकडे वळला. 'छूना है आसमान' आणि 'घोस्ट' यासारख्या अनेक टीव्ही मालिकेत त्याने अभिनय केला. त्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. मनीषने 'तीस मार खान', 'एबीसीडी' यासारखे चित्रपट केले. 'मिकी वायरस'मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली.
मनीषला खरी ओळख सूत्रसंचालनातून मिळाली. त्याने अनेक ॲवॉर्ड फंक्शन आणि स्टार नाईट्स कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलं आहे.
घरोघरी नोकर म्हणून केलं काम
मनीषने संयुक्ताशी लग्न केले. ती शिक्षिका आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मनीषने मोठं नाव कमावलं आहे. एकेकाळी त्याच्याकडे काहीच काम नसायचं. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, संघर्षाच्या दरम्यान, त्याच्या पत्नीने त्याला खूप पाठिंबा दिला.
त्याची पत्नी नोकरी करायची तर मनीष घरोघरी जेवण बनवण्यापासून साफसफाई, कपडे धुणे, भांडी घासणे पर्यंत सर्व काम केलं. त्यावेळी तो खूप चिंतेत होता. मनीष पॉलचे म्हणणे आहे की, त्याने अनेक चित्रपट केले. आयुष्यात चढ-उतार तर येतच राहतात. पण, जीवनात प्रयत्न कधी सोडायचे नाहीत.