गेल्या काही वर्षांत अनेक बॉलीवूड सेलिबि—टी विवाह बंधनात अडकले आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट-रणबीर कपूर, वरुण धवन-नताशा दलाल, सिद्धार्थ मल्होत्रा- किआरा अडवाणी यांनी थाटात लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाची चर्चाही खूप रंगली. अशातच अभिनेत्री तापसी पन्नू लग्न कधी करणार असा प्रश्वन चाहते विचारत असतात. तापसी हिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती बॅडमिंटनपटू प्रशिक्षक मॅथियास बोईसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे तापसीला लग्नाबद्दल विचारण्यात आले, पण तिने दिलेल्या उत्तरामुळे चाहते हैराण झाले आहेत. तापसी म्हणाली, मी अद्याप गरोदर नाही. जेव्हा लग्न करेन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन. अद्याप गरोदर नाही या वक्तव्यामुळे तापसी खूपच चर्चेत आली आहे. तापसी नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तापसी फार कमी प्रमाणात सक्रिय असते. तापसीने अनेकवेळा बॉयफ्रेंड मॅथियास बोईसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. पण ती कधी लग्न करणार हे अद्याप गुलदस्त्या आहे.