पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री ऊर्फी जावेद ( Urfi Javed ) नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेक वेळेस तिला त्यासाठी ट्रोल केले जाते. मात्र, त्यामुळे तिला काहीच फरक पडत नाही. आऊटफिटबद्दल ती कायमच नवे प्रयोग करत असते. आता ऊर्फीचा एक नवा लूक खूप व्हायरल झाला आहे. यावेळी तिने असा ड्रेस घालून अंग झाकले आहे, जे पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
ऊर्फी तिच्या इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती वाळलेले गवत, झुडुपे आणि पानांपासून बनवलेला ड्रेस घालताना दिसत आहे. ऊर्फीचा हा ड्रेस कसा बनला त्याची झलकही या व्हिडिओत दाखवली आहे. मला नेहमीच नील राणासोबत काम कराये होते. त्याचा आत्मविश्वास खूप मोठा आहे. पैसा अथवा साधने नसतानाही त्याने गावात जे काही उपलब्ध होते त्यातून कपडे बनवले. अशी कॅप्शन ऊर्फीने व्हिडिओला दिली आहे.
नील देशातील सर्वात मोठ्या डिझायनरसाठी काम करत आहे. अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या दयाळूपणाने मी दररोज आश्चर्यचकीत होते, असेही ऊर्फीने नमूद केले आहे. तुमच्यासारखे नमुने कुठून येतात? अशी टिका एकाने दीदी, पुदीना कितीली दिला? अशी दुसऱ्याने तर आता केवळ झिंगा लाला हू करणे वाकी आहे. अशी कमेंन्ट तिसऱ्या एकाने केली आहे.
हेही वाचा: