पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री कियारा अडवाणीने ( Kiara Advani ) अगदी कमी काळातच बॉलीवूडमध्ये स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाचा आनंद घेत आहे. आता कियाराच्या एका फोटोवरून ती गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, कियाराची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
यामध्ये तिने तिच्या गरोदर व्यक्त केली होती. कियाराची ही मुलाखत तिच्या गुड न्यूज चित्रपटाच्या प्रमोशन वेळची आहे. मुलाखतीत कियारा म्हणाली की, मला गरोदर राहायचे आहे जेणेकरून मी जे पाहिजे ते खाऊ शकेल. होणारे बाळ मुलगा आहे की मुलगी याने मला काही फरक पडत नाही. केवळ ते निरोगी असले पाहिजे.
कियाराने यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधली. हे लग्न जैसलमेर येथे जवळचे मित्र आणि उपस्थितीत पार पडले. कार्तिक आर्यनबरोबर सत्यप्रेम की कथा या चित्रपटा दिसली होती. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :