गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल नात्यांमध्ये असल्याचे म्हटले जात होते, तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात होते, तर आता डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
कॅटरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये भव्य-दिव्य पद्धतीने लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे; मात्र कॅटरिनाने काही दिवसांपूर्वी या सगळ्या अफवा आहेत, असं सांगत याला पूर्णविराम दिला होता; पण तिचे लग्न न करण्यामागचे मुख्य कारण बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार असल्याचे बोलले जात आहे.
कॅटरिना ही गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. कॅटरिनाने 'सूर्यवंशी' प्रदर्शित होण्यापूर्वी जर लग्नाची घोषणा केली, तर प्रसारमाध्यमांचे संपूर्ण लक्ष हे अक्षयकुमार किंवा सूर्यवंशी चित्रपटावरून कमी होईल. त्यामुळे निर्मात्यांना नुकसान होऊ शकते. याच कारणामुळे कदाचित कॅटरिना लग्नाबद्दल बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे.