पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड क्वीन अभिनेत्री कंगना राणावत ( Kangana Ranaut ) आपल्या वक्तव्यामुळे आपल्यावर नेहमीच चर्चेत असते. कंगनाची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. त्या पोस्टवर उत्तर देताना कंगनाने अभिनेता हृतिक रोशनचाही उल्लेख केला आहे. यामुळे पुन्हा कंगना आणि हृतिकचे नाते चर्चेत आले आहे.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रिव्हॉल्व्हर रानी' या कंगनाच्या ( Kangana Ranaut ) चित्रपटातील किसिंग सीनच्या वृत्ताबद्दलची ही पोस्ट होती. कंगनाने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये हे वृत्त शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रिव्हॉल्व्हर रानी या चित्रपटातील किसिंग सीनदरम्यान वीर दासच्या ओठांतून रक्त येऊ लागले होते. कंगना आणि वीर दास यांच्यातील हा किसिंग सीन होता. त्यावर कंगना म्हणाली, 'हृतिक रोशननंतर मी बिचाऱ्या वीर दासची अब्रू लुटली. हे कधी झाले?' यासोबतच तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला.
कंगना आणि हतिकमधील वाद जगजाहीर आहे. इतकेच नव्हे तर कंगनाविरोधात हृतिकने कोटीत धाव घेतली होती. त्यावेळी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली होती. केवळ बोललीच नाही तर हृतिकबद्दल मनात असलेला सगळा राग तिने या मुलाखतींमध्ये व्यक्त केला होता. क्रिश ३ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते.