पुढारी ऑनलाईन : 'हम है राही प्यार के' हा चित्रपट ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात आमीर खान, जुही चावला आणि नवनीत निशान ( Navneet Nishan ) प्रमुख भूमिकेत होते. आता नवनीतने या सिनेमाबाबतच्या काही गोष्टी शेअर केल्या. तसेच तिने आमीरबरोबरच्या किसिंग सीनवरही भाष्य केले आहे.
या चित्रपटात नवनीतने ( Navneet Nishan ) खलनायक बिजलानी म्हणजेच दिलीप ताहिलच्या मुलीची म्हणजेच मायाची भूमिका साकारली होती. तिला राहुल म्हणजेच आमीरशी लग्न करायचे असते. चित्रपटात आमीर आणि नवनीत यांचा एक किसिंग सीन होता. पण हा सीन नंतर चित्रपटातून काढून टाकला. यावर नवनीत म्हणाली, आमीर तर आमीरच आहे. त्याने मला दिवसभर किसिंग सीन करायला लावले होते.
किसमध्ये सातत्य असायला हवे, असे त्याचे मत होते. त्यामुळे मी आमीरच्या गालावर अनेकदा किस केले आणि दिवसभर सराव केला. अशा स्थितीत दिवसभरात मी त्याच्या गालावर ७ ते ८ वेळा किस केले. मी आमीरच्या घरातून आले तेव्हा मी सर्वांना सांगितलं की, मी आमीरला दिवसभर किस केले. मी लॉटरी जिंकली आहे. नवनीतचा हा खुलासा सध्या खूपच चर्चेत आहे.
हेही वाचा :