bb marathi- 3 : आज पुन्हा कळलं विकास पाटील काय आहे ते-जय - पुढारी

bb marathi- 3 : आज पुन्हा कळलं विकास पाटील काय आहे ते-जय

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या (bb marathi- 3) घरात सुरू असलेल्या टास्कमध्ये दोन्ही टीममधील सदस्य विशाल आणि विकास दोघांवर नाराज असल्याचे आज दिसून येणार आहे. विकासने दादूसला आऊट केल्याने विशालच्या त्या निर्णयावर आक्षेप घेतला. आणि दादूस यांच्या चेहर्‍यावरचे हास्य कार्य दरम्यान अजिबात कमी न झाल्याचे विशालला सांगितले. (bb marathi- 3)

टास्क रद्द होऊ नये म्हणून विशालन ते नाव खोडले. यावरूनच मीरा आणि जय विकास – विशाल वर चिडले. या मुद्द्यावरुन पहिले विशालचा विकाससोबत खूप मोठा वाद झाला आणि आज जय – विशालचे मोठे भांडण बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये विशालला जय खूप काही बोलला. हा मुद्दा इथेच संपला नसून जय आणि मीराचा आज विकाससोबत याच गोष्टीवरुन वाद होणार आहे.

ज्यामध्ये जय विकासला उद्देशून म्हणताना दिसला, कोणी पण manipulate करणार येऊन जाऊन उटसूट आणि हा तसा वागणार सोनाली म्हणाली, ताई काय असं वाक्य बोलल्‍या ते सांगशील का जय ? त्यावर विकास म्हणाला “मी माझी बाजू मांडणार, मी काही त्याला नाव खोड असं बोललाे नव्हतो. मी माझ्या टीमकडून जे मला बोलायचे आहे ते बोलणार. मला टास्क रद्द करायचा नव्हता म्हणून मी त्याला एक गोष्ट सांगितली. आणि सगळ्यांनी बघितलं आहे दादूसच्या चेहर्‍यावर शेवट पर्यंत स्माईल होतं”.

त्यावर जय म्हणाला गुड फॉर यू … ऑल द बेस्ट, आज परत कळलं विकास पाटील काय आहे ते. जय म्हणाला मग तू का नाही माघार घेतलीस मीरा आणि आविष्कारच्या वेळेला. किती खोट बोलतोस तू विकास.” मीरा म्हणाली “दुसर्‍यांचं ऐकून आपल्याला आऊट केलं आहे त्याने.”

नक्की कोण खरं बोलतं आहे ? कोणाची बाजू सत्याची आहे ? कळेलच आजच्या भागामध्ये. तेव्हा पहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.  कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button