bbm 3 : मीरा म्हणते, डायरेक्ट टक्कल कर म्हणायचं - पुढारी

bbm 3 : मीरा म्हणते, डायरेक्ट टक्कल कर म्हणायचं

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी घरातील ‘संयमाची ऐशी तैशी’ या टास्कमध्ये डेव्हिल बनलेली टीम एक से बडकर एक युक्त्या लढवून देवदूत झालेल्या सदस्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देवदूत बनलेले सदस्य संयम राखून त्यांचे कार्य पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आजच्या भागात जय, मीरा आणि तृप्तीताई प्लॅन करताना दिसणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात कोणती टीम विजयी ठरणार? कोणती टीम हरणार ? यांची उत्सुकता चाहत्यांची शिगेला पोहोचली आहे.

‘संयमाची ऐशी तैशी’ या टास्कमध्ये जय, मीरा आणि तृप्ती एकेमकांशी संभाषण करताना दिसले आहेत. यावेळी जय म्हणाला, ‘केस कापायला सांगायचे नाही. हे मी करणार नाही.’

मीरा त्यावर म्हणाली, ‘मी तेच म्हणते की विकास आणि मीनलला सांगायचं. केस वैगरे नाही डायरेक्ट टक्कल करणास सांगायचे, हे करण्यास ते तयारच होणार नाहीत. परंतु, त्यांना टक्कल करण्यास भाग पाडायचे. यासाठी त्यांना बाहेर जावेच लागेल.’

जय तृप्तीताईंशी बोलताना म्हणाला की, ‘हिला पहिले तुम्ही बघा कसा टास्क द्यायचा. हिच्यासाठी नंतर बघा मी काय करतो, अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवेल. तसं काहीतरी करतो.’

यावर मीरा म्हणाली, ‘बाहेरून तू त्रास दे एकाला नक्की.’ जय म्हणाला, ‘विकास आणि मीनल टक्कल नाही करणार.’ या तिघांच हे संभाषण सुरू असताना स्नेहा त्याच्या मागेच बसली होती. तिला चिडवत जय म्हणला ‘तृप्ती काही बोलू नकोस.’

बघूया या कोणती टीम किती यशस्वी ठरेल? तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button