पुढारी ऑनलाईन डेस्क : एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 'गुंटूर करम'च्या शूटिंगमध्ये वेळेच्या समस्येमुळे पूजाने (Pooja Hegde) चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'गुंटूर करम'चे शूटिंगच्या वेळेत वारंवार बदल होत आहे. टीम काही सीक्वेंसचे शूटिंग करत होती. आणि पुढील शेड्यूलसाठी पुन्हा वेगवेगळ्या कारणांवरून अभिनेत्रीला वेळ देता येत नाहीये. (Pooja Hegde)
पूजा हेगडेने शेवटचा बॉलिवूडपट 'किसी का भाई किसी की जान' मध्ये सलमान खानसोबत काम केले होते. आता अभिनेत्री महेश बाबूसोबत 'गुंटूर कारम' चित्रपटावरून अभिनेत्री या प्रोजेक्टमधून बाहेर झाली आहे.
'किसी का भाई किसी की जान' पूर्वी पूजाने 'सर्कस', 'मोहनजोदडो' यासारखे चित्रपट केले होते. पण, हे चित्रपट म्हणावे तसे चालले नाहीत. पूजाला 'गुंटूर कारम' मधून पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकण्याची संधी होती. पण मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्याने पूजा या चित्रपटातून बाहेर झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा जून ते डिसेंबर दरम्यान अनेक चित्रपटात काम करणार आहे. 'गुंटूर करम'च्या शूटिंगमध्ये होत असलेले फेरबदलमुळे अन्य चित्रपटाच्या शेड्यूलमध्ये व्यत्यय येऊ शकते.
दरम्यान, महेश बाबू आता एसएस राजामौलीचा चित्रपट 'SSMB29' मध्ये दिसणार आहे. शिवाय त्याच्याकडे पुरी जगन्नाथ यांचा चित्रपट 'जन गण मन' देखील आहे. यामध्ये जान्हवी कपूरदेखील मुख्य भूमिकेत होती.