पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावर सुरु होतंय गाण्याचं दुसरं पर्व अर्थातच 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'. पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन १० जूनपासून सज्ज होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचं ( Mi Honar Superstar Chhote Ustad २ ) सूत्रसंचालन करणार आहे.
सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगताना वैदेही म्हणाली की, 'एका सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी 'छोटे उस्ताद' च्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते. या मंचावरचं टॅलेंट पाहून मी भारावून गेले होते. इतका भरभरुन प्रतिसाद पहिल्या पर्वाला मिळाला. याच प्रेमापोटी दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे. ज्या पद्धतीचं टॅलेंट या मंचावर आहे ते पाहून अवाक व्हायला होतं. इतक्या लहान वयात एवढा आत्मविश्वास पाहून खरंच मी भारावले आहे.'
'सूत्रसंचालन नक्कीच आव्हानात्मक आहे. कारण, इथे प्रसंगावधान राखावं लागतं. लहान मुलांसोबत जमवून घेणं आणि त्यांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे. खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. मी नेहमीच वेगवेगळे लूक्स आणि स्टाईल ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनवे लूक्स करण्याची संधी मिळणार आहे. पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता. यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.' असेही वैदेहीने सांगितले आहे. ( Mi Honar Superstar Chhote Ustad २ )
हेही वाचा :