anushka sharma : अनुष्कासोबत वामिकाचा फोटोवर रणवीर म्हणाला... - पुढारी

anushka sharma : अनुष्कासोबत वामिकाचा फोटोवर रणवीर म्हणाला...

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma ) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दोघेजण सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रिय असतात. सध्या अनुष्का शर्मा हिने आपल्या ६ महिन्यांच्या वामिकासोबत एक क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने हटके कॉमेंन्ट दिली आहे.

अनुष्का शर्माने (anushka sharma ) नुकतेच दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने आपल्या इंन्स्टाग्रामवर स्वत: आणि वामिकासोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोत वामिकाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, परंतु, अनुष्का आपल्या मुलीसोबत टाईम स्पेंन्ड करताना दिसत आहे.

अनुष्काने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘माझा प्रत्येक दिवशी शूर आणि अधिक धैर्यवान बनवत आहेस. माझी छोटीशी वामिका. तुम्हाला अष्टमीच्या शुभेच्छा.’ असे लिहिले आहे. या फोटोत मायलेंकीची जोडी खूपच क्यूट दिसत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसोबत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. या फोटोला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत वाणी कपूर, मौनी रॉय, प्रियांका चोप्रा, सुनील शेट्टी, जेनेलिया डिसूझा सारख्या अनेक स्टार्सनीही आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रणवीर सिंहने या फोटोला ‘Oh-lay!’ अशी हटके कॉमेंन्ट देत प्रेमाचा ईमोजी देखील शेअर केला आहे. यासोबत चाहत्यांनी ‘क्यूट’, ‘प्रेमळ’ यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

याआधी विराट आणि अनुष्कानं वामिका ६ महिन्यांची झाल्यावर सेलिब्रेशन केले होते. यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय अनुष्का नेहमी आपले हॉट फोटोज शेअर करून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंहने ‘बँड बाजा बारात’, ‘लेडी वर्सेज़ रिकी बहल’ या चित्रपटात एकत्रित दिसले होते. याच दरम्यान अनुष्का आणि रणवीरची नावे एकमेकांशी जोडली गेली होती. परंतु, यानंतर अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीशी विवाह बंधनात अडकली.

हेही वाचलंत का? 

Back to top button