बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) हिने रविवारी तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या वाढदिनी तिच्या फॅन्सलाही एक सरप्राईझ मिळाले. रकुलने निर्माता, अभिनेता जॅकी भगनानीसोबतच्या (Jackky Bhagnani) नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दोघांनीही सोशल मीडिया पोस्टमधून नातेसंबंधांचा खुलासा केला आहे.
(Rakul Preet Singh and Jackky Bhagnani) दोघांनी एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटोही व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन जाताना दिसत आहेत. सोबत जॅकीने लिहिले आहे की, तुम्हारे बिना दिन, दिन नहीं लगते। सबसे खुाबसूरत शख्सियत को जन्मदिन की शुभकामनाए, जो मेरे लिए दुनिया है। हैप्पी बर्थडे माय लव्ह। रकुलनेही हाच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, 'थँक यू माय लव्ह, तू यावर्षीचे सर्वात मोठे गिफ्ट आहेस', अशी पोस्ट केली आहे.