हृतिक रोशनने आर्यन खानसाठी दिलेल्या प्रतिक्रियेवर सुहाना खान म्हणाली…
मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपला पाठिंबा दर्शविला होता. आता शाहरुख आणि गौरीची मुलगी आणि आर्यनची बहीण सुहाना खान हिने देखील आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला काल झालेल्या सुनावणीत जामीन नाकारण्यात आला आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (दि. ८) रोजी होणार आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यापासून चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपआपल्या प्रतिक्रीया देत आहेत.
शाहरुखला बॉलिवूड इंडस्ट्रीकडूनही प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. आर्यनला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, सुजैन खान, कंगना राणावत, हृतिक रोशन यासारख्या अनेक स्टार्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सध्याच्या हृतिक रोशनच्या प्रतिक्रियेनंतर आर्यनची बहीण सुहानाने आपल्या भावाला पाठिंबा दिला आहे.
सुहान खानची प्रतिक्रिया..
सुहाना खान नेहमी आपले फोटो शेअर करून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सध्या सुहानाने हृतिक रोशनच्या प्रतिक्रियेनंतर आपली कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, त्याच्या पोस्टला लाईक्स केलं आहे. यावरून असे दिसते की, सुहानाला आर्यनसोबत घडलेल्या प्रकरण आणखीन वाढवायचे नाही. त्यामुळे तिने काहीही न बोलणे पसंद केलं आहे. यावरून तिचा आर्यनला पाठिंबा असल्याचे दिसते.
काय आहे हृतिक रोशनची पोस्ट
'माय डिअर आर्यन. जीवन एक विचित्र प्रवास आहे. कारण काहीही निश्चित नाही. हे छान आहे कारण ते तुमच्यासाठी कठीण परिस्थिती आणते. परंतु, देव खूप दयाळू आहे. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या लोकांसमोर देव नेहमीच कठीण परिस्थिती निर्माण करतो. या सगळ्या गोंधळात तुम्ही स्वतःला सांभाळू शकता. आणि मला माहित आहे की तुम्हालाही ते वाटत असावे.
हे जाणून घ्या की, आपण त्या सर्वांसह चांगले विकसित होवू शकता. मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो आणि मी तुम्हाला माणूस म्हणून ओळखतो. तुम्ही जे काही अनुभवता. ते आत्मसात करा. ती तुमची भेट आहे. माझ्यावर विश्वास ठेव. अशावेळी जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील.
जर तुम्ही सैतानाच्या डोळ्यात पाहिले असेल आणि स्वतःला शांत ठेवले असेल. शांत राहा गोष्टी पहा. या गोष्टी तुम्हाला उद्यासाठी घडवतील. आणि उद्याचा दिवस आशेने भरलेला असेल. पण यासाठी तुम्हाला अंधारातून जावे लागेल. शांत रहा आणि स्वतःला हरवू नका. आशेच्या प्रकाशावर विश्वास ठेवा, तो नेहमीच असतो. खूप प्रेम. ७ ऑक्टोबर २०२१. असे हृतिक रोशनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हृतिक रोशनची माजी पत्नी सुजैन खाननेही शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या पाठिंब्यासाठी आर्यन खानविषयी गोडवे गायले आहेत.
सुहानाने गौरीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शाहरुख खानची मुलगी सुहानाने आई गौरी खान हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरीचा शाहरुख सोबतचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत सुहानाने 'हॅप्पी बर्थडे मॉं' असे कॅप्शनसोबत हार्ट इमोजी शेअर केला आहे.