पुढारी ऑनलाईन डेस्क : हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स असलेल्या सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरमधून शिगेला पोहोचलीय. असून, "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे.
आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं संगीत आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय.
आतापर्यंत टीझरमध्ये वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांची भूमिका आपल्याला पहायला मिळाली होती आणि आता ट्रेलरमध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एंट्री झाली आहे.
वैभवनने या चित्रपटातील भूमिकेसाठी मेहनत घेऊन सिक्स पॅक बॉडी केली आहे. या लुकचं खूप कौतुकही झालं आहे. पण वैभवच्या या सिक्स पॅक लुकचं महत्त्व चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे रोमान्स आणि तगडी अॅक्शन या चित्रपटात आहे. सतत वैतागणाऱ्या, चिडणाऱ्या तरुणाची गोष्ट या चित्रपटात असल्याचं ट्रेलरमधून कळतं. पण तो असा का आहे? त्याच्यावर सतत मारधार करण्याची वेळ का येते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष चित्रपटातच मिळतील. त्यामुळे आता केवळ काहीच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
high