Navratri Utsav : पिवळ्या रंगात सजल्या 'या' अभिनेत्री - पुढारी

Navratri Utsav : पिवळ्या रंगात सजल्या 'या' अभिनेत्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन: नवरात्री उत्सवाला (Navratri Utsav) सर्वत्र आजपासून प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या संसर्ग असल्याने अजूनही सर्वत्र अगदी साधेपणाने नवरात्री उत्सव (Navratri Utsav) साजरा करण्यात येत आहे. तर याचदरम्यान मंदिरे भाविकाच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. या उत्सवात खास करून नवरंगाचे महत्व खूपच असते.

सध्या नवरात्रोत्सवानिमित्ताने वेगवेगळे फोटोशूट करण्याचा ट्रेंड सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. यात सर्वसामान्यापासून कलाकारांपर्यत कोणीही मागे नाही. मराठी अभिनेत्रींनी आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्याच रंगात फोटोशूट केले आहे. तर मग जाणून घेऊयात कोणकोणत्या त्या अभिनेत्री…

ऋतुजा बागवे

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नवरात्रीच्या निमित्ताने पहिल्या दिवसाशी पिवळ्या रंगाच्या नऊवारीत फोटोशूट केली आहे. या फोटोत ऋतुजाने नऊवारी साडीसोबत निळ्या रंगाचे ब्लाउज परिधान केला आहे. यासोबत तिने भरजरी दागिन्यासोबत केसांत गजरा माळला आहे. हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोसोबत तिने ‘इतिहास आणि पौराणिक कथांचा आपल्या आधुनिक जीवनावर प्रभाव नेहमीच असतो. कला व परंपरा याचे जतन करीत आपण सण साजरे करतो. आज नवरात्रीचे नऊ दिवस सुरू होत आहे… असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

राजेश्वरी खरात

नवरात्रीचे निमित्त साधत ‘फॅन्ड्री’ फेम राजेश्वरी खरात हिने पिवळ्या रंगात फोटोशूट केलं आहे. या फोटोत तिने पिवळ्या रंगाच्या साडीसोबत काळ्या रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे. यासोबत तिने हिरव्या बागड्यासोबत दागिने परिधान केले आहे.

या फोटोसोबत राजेश्वरीने आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो अशी अंबे मातेच्या चरणी प्रार्थना करते. असे लिहिले आहे.

भार्गवी चिरमुले

मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले नवरात्रीच्या शुभेच्छा देत एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत भार्गवी चिरमुले खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये भार्गवीने ‘या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ व घटस्थापनेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!’ अशी कॅप्शन दिली आहे.

रश्मी अनपट

मराठी अभिनेत्री रश्मी अनपट हिने नुकतेच नवरात्रीच्या शुभेच्छा देत पिवळ्या रंगाची साडीत फोटोशूट केले आहे. यासोबत तिने गुलाबी रंगाच्या ब्लाउजसोबत साजेशीर दिगुने परिधान केले आहेत. हा फोटो तिने आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, आजचा रंग- पिवळा’. लिहिले आहे. या फोटोत रश्मीने मराठमोला लूक केला होता.

श्वेता शिंदे

डॉ. डॉन फेम आणि मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे हिने नुकतेच पिवळ्या रंगाच्या घागरा-चोलीत फोटोशूट केलं आहे. श्वेता ब्राईडल थीम करून चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत श्वेताने पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर केला आहे. हा लूक तिचा सौंदर्यात आणखीण भर घालत आहे.

या फोटोसोबत श्वेताने ‘Navratri Special ‘Bridal Theme’!Today’s Colour : Yellow ‘ अशी कॉमेंन्टस दिली आहे. या फोटोवर चाहत्यांचा पाऊस पडत आहेत. यात एकाने ‘अप्रतिम’, ‘ग्लॅमरस’, ‘[हॉट’ अशा कॅप्शन लिहिल्या आहेत.

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आपल्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच एक फोटो सेअर केला आहे. या फोटोत तिने सोनेरी पदर असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या साडी आणि ब्लाऊजमध्ये ती दिसत आहे. या फोटोसोबत तिने नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘नवरात्रौत्सव – दिवस पहिला आजचा रंग – पिवळा, शैलपुत्री माता. शैलपुत्री देवी हे दुर्गाच्या नऊ रूपांपैकी पहिल्या स्वरूपात ओळखली जाते. हिमालय पर्वत राजाची मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले. पिवळा रंग हा सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो. असे लिहिले आहे.

गायत्री दातार

बिग बॉस फेम गायत्री दातार हिने देखील पिवळ्या रंगाच्या वनपिसमधील नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटोसोबत तिने नवरात्रौत्सव – दिवस पहिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button