मुंबईतील एका क्रुझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये मुनमुन धमेचा या तरुणीचाही समावेश आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावरही मुनमुन धमेचा हिच्या नावाची चर्चा आहे. अखेर ही मूनमून आहे तरी कोण?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने शनिवारी एका हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला. ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. रविवारी सायंकाळी सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी या सर्वांना अटक करण्यात आली. यावेळी शाहरुखचा मुलगा आर्यनसोबत मुनमुनही होती.
मुनमुन एक मॉडल आहे. ती ३९ वर्षांची आहे. 'एनसीबी'ने ३ ऑक्टोबरला दुपारी दाेन वाजता तिला अटक केली होती. मुनमुन ही मूळची मध्य प्रदेश राज्यातील सागर जिल्ह्यातील. तिचे वडील उद्याेजक हाेते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
मुनमुन धामेचा हिच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले होते. तिचा भाऊ प्रिंस धमेचा हा दिल्लीत वास्तव्याला आहे.
मुनमुनने आपले शालेय शिक्षण सागर जिल्ह्यात पूर्ण केले. सागर जिल्ह्यात फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे. कारण मागील काही वर्ष ती आपल्या भावासोबत दिल्लीत आणि त्याआधी भोपाळमध्ये राहिली आहे.
मुनमुन नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, विकी कौशल आणि अन्य अभिनेत्यांना फॉलो करते.
पाहा व्हिडिओ : मी कॉमेडी मध्ये अॅक्शन कॉमेडी आणणारे हास्यसम्राट #अशोक सराफ