अभिनेत्री सायली चौधरी हिचे ‘प्रेमात तुझ्या’ गाणं पाहिलं का?

सायली चौधरीचे नवे गाणे रिलीज
सायली चौधरीचे नवे गाणे रिलीज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सध्याची तरुण पिढी प्रेम भावनेला अधिकच मापात तोलते आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशाच प्रेम भावनेला व्यक्त करण्यासाठी प्रेमाचं गाणं पाहायला मिळतय. अभिनेत्री सायली चौधरी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीद यांचं नवं गाणं भेटीला येणार आहे. सायली चौधरी ही 'प्रेमात तुझ्या' या प्रेमगीतातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे. या दोघांची जोडगोळी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेम ही भावना एवढी अमर्याद आहे. त्याबद्दल कितीही लिहावे तितके थोडेच. प्रेमाची अभिव्यक्ती अनेक रूपांनी होताना आपण पाहतोच. समाजावरील, कुटुंबावरील, व दोन व्यक्तींचे एकमेकांवरील प्रेम अनेक प्रकारांनी व्यक्त होत असते.

प्रेयसी आणि प्रियकर यांचे प्रेम पाहता ही प्रेम भावना कधी संपू नयेच असे वाटते.

प्रेमी युगुलांमधील प्रेम हे हल्ली बऱ्याच गाण्यांमधून म्हणा वा चित्रपट, मालिकांमधून व्यक्त होताना आपण पाहतोच.

नाटक, मालिकाविश्वात अभिनयाला प्रथम प्राधान्य देणारी सायली सर्वानीच पाहिली. 'देवयानी', 'रुंजी', 'छत्रीवाली', 'सारे तुझ्याच साठी' यासारख्या बऱ्याच मालिकांमधून ती दिसली. 'गलतीसे मिस्टेक' या नाटकातून तिने आपला ठसा उमटविला आहे.

अभिनयासह नृत्याची आवड जोपासत ती नव्याने 'प्रेमात तुझ्या' या गाण्यातून भेटीली आलीय.

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला ती सज्ज झाली आहे.

सिद्धार्थ खिरीदसह ती या गाण्यात थिरकताना दिसणार आहे.

दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात दिग्दर्शित हे गाणे आहे.

या गाण्याचे नयनरम्य चित्रीकरण सागर आंबात यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

या गाण्याच्या संकलनाची जबाबदारीही सागर आणि सचिन यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.

या गाण्याची कोरिओग्राफी हर्षद वाघमारे याने केलीय. या गाण्याच्या संगीताची धुरा वरून लिखातेने सांभाळलीय.

गाण्याचे बोल मंदार चोळकर लिखित आहेत. श्रुती राणे हिने या गाण्याला आपल्या सुमधुर स्वरात संगीतबद्ध केले आहे.

'मिहान एंटरटेनमेंट' आणि 'व्हिडीओ पॅलेस' प्रस्तुत हे गाणे आहे. 

'प्रेमात तुझ्या' म्हणत सायली आणि सिद्धार्थची लव्हेबल केमिस्ट्री पाहणे ही प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news