cruise drugs party update : माझा मुलगा आर्यन जेव्हा मोठा होईल तेव्हा माझी अशी इच्छा आहे की, ज्या गोष्टी मी तरुणपणी करु शकलो नाही त्या गोष्टींचा त्याने अनुभव घ्यावा. आर्यनने मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्सचाही अनुभव घ्यावा. त्याने एक बॅड बॉय व्हावे तो जर गूड बॉय झाला तर मीच त्याला खराबाहेर काढेन अशी पतंगबाजी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने एका मुलाखतीवेळी उधळली होती.
आता आर्यन ड्रग्ज पार्टीत cruise drugs party अडकल्याने वडिलांची मनोकामना पूर्ण केली का? असा सवाल सोशल मीडियातून विचारला जात आहे. आर्यनचे नाव समोर नशेत धुंद असलेल्या बॉलिवूडमधील पुन्हा एकदा वास्तव समोर आले आहे.
ही परिस्थिती एका बाजूला असताना पैसा व गर्भश्रीमंती असतानाच अनेक सेलिब्रेटी व्यसनापासून कोसो दूर cruise drugs party असल्याचेही दिसून येतात. बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक असतात. असे अनेक सेलेब्स आहेत जे दारूपासून लांब राहतात. या रिपोर्टमध्ये आज अशा सेलेब्सची माहिती घेणार आहोत.
शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात. बिग बी मद्यपान आणि धूम्रपानही करत नाहीत. तसेच, ते मांसाहारीलाही स्पर्श करत नाहीत.
शिल्पा एक फिटनेस प्रेमी आहे आणि ती तिच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेते. शिल्पा शेट्टी दारूला स्पर्शही करत नाही.
जॉन अल्कोहोलला स्पर्शही करत नाही आणि अनेकांना यावर विश्वासही बसणार नाही. जॉन त्याच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक आहे.
सोनाक्षी सिन्हाचे गेल्या काही महिन्यांत बरेच वजन कमी झाले आहे. सोनाक्षी खूप वर्कआउट करते. तसेच ती दारूला स्पर्श करत नाही.
बॉलिवूडमध्ये प्रवेश करताच परिणीती चोप्रा तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करू लागली. परिणीती देखील दारूला स्पर्श करत नाही.
स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दीपिका पदुकोण योगा करते आणि तिचे खाण्यापिण्यावर बरेच नियंत्रण असते. दीपिका दारूला स्पर्शही करत नाही.
सिद्धार्थ मल्होत्रा हा एक फिटनेस फ्रिक आहे आणि तो मद्यपान करत नाही किंवा धूम्रपान करत नाही. सिद्धार्थ मल्होत्रा आपला बहुतेक वेळ जिममध्ये घालवतो.
चित्रपटांमध्ये आपल्याला अक्षय कुमार वेगळा दिसत असला, तरी व्यक्तीगत आयुष्यात तो अल्कोहोलपासून दूर आहे.
हे ही वाचलं का?