Jacqueline Fernandez : मेन्स इनरवियरची जाहिरात केल्याने जॅकलिन ट्रोल

Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चर्चेत आली होती. आता ती एका जाहिरातीमुळे चर्चेत आलीय. ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे, जिने मेन्स इनरवियरची जाहिरात केलीय. जॅकलिनने इन्स्टावर या जाहिरातीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. नेटकऱ्यांनी जॅकलिनला ट्रोल करत काय म्हटलंय पहा. एका युजरने म्हटलंय – आता बास एवढचं बघाय़चं बाकी राहिलं होतं. आणखी एका युजरने म्हटलंय- ही कसली जाहिरात आहे? तर काही फॅन्सनी जॅकलिनवर प्रेम व्यक्त केलंय. (Jacqueline Fernandez)

व्हॅलेंटाईन डे ला सुकेशला आली जॅकलिनची आठवण

दरम्यान, ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला व्हॅलेंटाईन डे विश केलं. सुकेशने मीडियाशी बोलताना सांगितलं की, जॅकलिन माझ्याकडून हॅप्पी व्हॅलेंटाईन डे सांगा. सुकेशला कोर्टात हजर करायला नेत असताना त्याला विचारण्यात आले की, जॅकलीनद्वारा लावण्यात आलेल्या आरोपांवर तुम्ही काय सांगू इच्छिता?

तिला माझ्याकडून हॅप्पी व्हॅलेंटाईन डे विश करा

मीडियाला उत्तर देताना सुकेश चंद्रशेखरने सांगितलं की, मला तिच्याबद्दल काही सांगायचे नाही. माझ्याकडून तिला हॅप्पी व्हॅलेंटाईन डे सांगा. तिच्याकडे माझ्याबद्दल सांगण्याची कारणे असतील.

जॅकलिन फर्नांडिसने कोर्टात सुकेश चंद्रशेखर विषयी सांगितलं की , तिच्या भावनांशी तो खेळला आहे. तिचं आयुष्य उद्धव्स्त केलं आहे. सुकेशसोबत जॅकलिनचंही नाव २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समोर आलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news