Sonalee Kulkarni : फिटिंग ड्रेस अन् लांब केसांत झळकली सोनाली | पुढारी

Sonalee Kulkarni : फिटिंग ड्रेस अन् लांब केसांत झळकली सोनाली

पुढारी ऑनलाईन डेस्क : अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘झिम्मा’, ‘पांडू’ आणि ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातून तिच्या अभिनयाचा ठसा उमठविला आहे. सोनालीच्या अनेक चित्रपटाला पुरस्कारदेखील मिळाले आहे. तिच्या अभियनासोबत सौदर्यांची जादू कायमच चाहत्यांच्या मनात घर करून आहे. तिची एका झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता सोनालीच्या आणखी काही हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. Sonalee Kulkarni च्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरच्या मिनी शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. सोनालीने या फोटोला किलर पोझ दिली असून यात ती खूपच मनमोहक आणि ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो ब्लॅक ॲण्ड व्हाईट असून तिच्या सौदर्यांची जादू पाहायला मिळालीय. यातील खास म्हणजे, सोनालीच्या नजरेने आणि सौदर्यांने चाहत्यांना भूरळ पडली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘In the beginning it was all black and white!’ असे लिहिले आहे. यावेळी सोनाली विना मेकअपमध्ये देखील ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो शेअर होताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

‘Very beautiful, awesome, your eyes and complete body language gives Goddesses feeling’, ‘❤️love black and white photos ❤️❤️’, ‘Very hot🔥🔥pic’, ‘tumhi na saree madhech bhari dista…😍🔥❤️’, ‘hot kadkkkkk 🔥🔥’, ‘Outstanding Awesome 👌’, ‘Black and white so so Sonali’, ‘❤️उत्कृष्ट❤️खुप सुंदर❤️’, ‘Ufff ye Aankhe…..🔥🔥🔥’, ‘Cute 🥰🔥❤️🙌’, ‘Black ❤️’,’ Superb 😍’, ‘Oye hoye 🔥’, ‘Golden beauty ❤️❤️❤️🔥🔥’, ‘Wow hottie 😍🔥’, ‘Sizzling😍😍’, ‘Killing look 🤐😍’, ‘Very Nice Butiful Actors Celibrity’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने ‘Uffff hottie 😍😍😍’ आणि मेघना एरंडे नऊ हार्टवाले ईमोजी आणि सोनाली खेरे हिने सोनालीच्या फोटोंवर कॉमेन्टस केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत ३५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

‘झिम्मा’, ‘पांडू’ आणि ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाशिवाय सोनालीने बकुळा नामदेव घोटाळे, नटरंग , क्षणभर विश्रांती, इरादा पक्का, अजिंठा, झपाटलेला २, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, टाइमपास २, पोश्टर गर्ल, तुला कळणार नाही, हम्पी, हिरकणी, धुरळा, ग्रँड मस्ती, सिंघम २ या चित्रपटात अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरदेखील अपडेटस देत सक्रिय असते.

हेही वाचा : 

Back to top button