त्याने मागून येऊन माझ्या…सोनमने सांगितला ‘तो’ किस्सा | पुढारी

त्याने मागून येऊन माझ्या...सोनमने सांगितला 'तो' किस्सा

सोनम कपूर बॉलीवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री ‘सावरियाँ’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर सोनमने ‘निरजा’, ‘रांझणा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. कपूर घराण्यात जन्मलेल्या सोनमलाही लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. सोनमने एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होते. सोनमने अ‍ॅक्ट्रेस राऊंडटेबल या राजीव मसंद यांच्या शोला हजेरी लावली होती. या भागात सोनमसह आलिया भट्ट, राधिका आपटे, विद्या बालन व अनुष्का शर्माही सहभागी झाल्या होत्या. या मुलाखतीत सोनमने तिच्या बरोबर घडलेला प्रसंग सांगतिला होता. 13 वर्षांची असताना सोनमबरोबर एका व्यक्तीने लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. चित्रपटगृहात सिनेमा बघण्यासाठी गेलेले असताना हा प्रसंग घडला होता. चित्रपटगृहात असताना एका व्यक्तीने मागून येऊन माझ्या छातीला पकडले. तेव्हा मी छोटी होते. मी घाबरून थरथरत होते. मी काय करू हे मला कळत नव्हते. उभी राहून मी जोरजोरात रडायला लागले, असा खुलासा सोनमने केला होता.

Back to top button