Janhvi Kapoor : जान्हवी बॉयफ्रेंडसोबत करणच्या घराबाहेर; कॅमेऱ्यासमोर लाजली (Video)

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिली फेम बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकादा चर्चेत आली आहे. आता जान्हवी कपूर तिचा खास मित्र शिखर पहारियासोबत स्पॉट झाल्याने पुन्हा एकदा दोघांच्या डेटिंगची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान जान्हवीचा शिखर बॉयफ्रेंड खरंच आहे काय? याबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले जात आहेत. मात्र, याबबातची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) आणि बॉयफ्रेंड शिखर पहारिया दोघेजण गेल्या वर्षी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटला. मात्र, दोघांनी रिलेशनशीपचा खुलासा केलेला नव्हता. याचदरम्यान विरल भयानी इन्स्टाग्रामवर जान्हवी आणि शिखर दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ब्रांदा येथे निर्देशक, निर्माता करण जोहर यांच्या घराजवळून जाताना जाव्हवी- शिखर स्पॉट झाले आहेत. दोघेजण कारमध्ये असून पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला पोझ देताना जान्हवी लाजताना दिसतेय.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ' #Janhvikapoor with boyfriend #shekharpariya spotted at #KaranJohar house in bandra❤️?' असे लिहिले आहे. तर यावेळी शिखर कार चावताना आणि जान्हवी त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली दिसतेय. जान्हवी कॅमेऱ्यासमोर किलर पोझ दिली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'जान्हवीचा बॉयफ्रेंड आहे काय?', 'मुलगा खूपच सभ्य आहे'. तर दुसर्‍याने युजर्सने 'जान्हवीने त्याच्या नात्याबद्दल कधीच खुलासा केलेला नाही', असे म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत.

याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया एकत्रित स्पॉट झाले होते. याशिवाय दोघेही अनेक सेलिब्रिटींच्या पार्टीत एकत्रित दिसले आहेत. यामुळे याआधीही दोघेजण एकमेकांना डेट केल्याचे बोलले जात आहे. शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news