पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पठान'मुळे शाहरुख खानची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. जबरदस्त ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने तीन दिवसांत १५० कोटींचा आकडा पार केला आहे. जवळपास ४ वर्षांच्या ब्रेकनंतर 'पठान'च्या माध्यमातून किंग खानने दमदार वापसी केली आहे. आता रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने 'जवान'साठी कंबर कसली आहे.
शाहरुख खान लवकरच आगामी चित्रपट 'जवान'चे शूटिंग सुरू करणार आहे. हे ६ दिवसांचं शेड्यूल असेल. दावा केला जात आहे की, शाहरुख खान चित्रपट 'जवान'चे ॲक्शन सीक्वेस शूट करतील. अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील चित्रपटात दिसेल.
दिग्दर्शक एटली सध्या शाहरुख खानचा चित्रपट 'जवान'च्या पोस्ट-प्रोडक्शनमध्ये बिझी आहे. यावर्षी मार्चपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, अनेक शहरांमध्ये चित्रपटाचे शूट केले जाईल. 'जवान' मध्ये सुनील ग्रोवर, नयनतारा, योगी बाबू आणि रिद्धि डोगरा यासारखे अनेक स्टार्सदेखील दिसणार आहेत. यावर्षी 'जवान' हा शाहरुख खानचा दुसरा चित्रपट असेल. जे 'पठान'नंतर चित्रपटगृहांमध्ये दिसेल. हा चित्रपट २ जून, २०२३ रोजी रिलीज होईल.
'जवान' शिवाय शाहरुख खान चित्रपट 'डंकी'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' ॲक्शनने भरपूर आहे. चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.