Ajay Devgn : अजयच्या अथिया- राहुलला हटके शुभेच्छा | पुढारी

Ajay Devgn : अजयच्या अथिया- राहुलला हटके शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर ते दोघेही विवाहबंधनात अडकले. त्या दोघांच्या लग्नापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचदरम्यान अभिनेता अजय देवगणने ( Ajay Devgn ) अथिया आणि राहुलसाठी एक विशेष ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये त्याने अथिया आणि के. एल. राहुलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माझा प्रिय मित्र सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांना त्यांची मुलगी अथिया शेट्टीच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. अथिया आणि के. एल. राहुलचेही अभिनंदन. या तरुण जोडप्याला आनंदी वैवाहिक वैवाहिक शुभेच्छा आणि अन्ना, तुम्हालाही या शुभ प्रसंगासाठी खूप खूप शुभेच्छा. लव्ह अजय…’, असे अजय देवगणने म्हटले. दरम्यान, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ( Ajay Devgn )

Back to top button