पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चा टीजर २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. (Salman Khan ) या वृत्ताची पुष्टी स्वत: दबंग खानने आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिलीय. सलमानने सांगितलं आहे की, 'मोठ्या पडद्यावर हा टीजर तुम्ही पाहू शकाल.' (Salman Khan )
सलमान खानच्या चित्रपटाचा टीजर शाहरुख खानचा चित्रपट 'पठान'सोबत दाखवला जाईल. तसेच 'पठान'मध्ये प्रेक्षकांना सलमानचा कॅमियोदेखील पाहायला मिळेल. फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' ईदच्या निमित्ताने २३ एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.
'किसी का भाई किसी की जान' सलमान खान शिवाय पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी आणि सिद्धार्थ निगम या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटामध्ये ॲक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि इमोशनचा तडका पाहायला मिळणार आहे.