पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आता आगामी चित्रपटात नव्या अवतारात दिसणार आहे. आपल्या जबरदस्त अंदाजाने साराने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. फॅशन आयकॉन असलेली सारा 'ऐ वतन मेरे वतन' मध्ये एकदम नव्या लूकमध्ये दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढलीय. 'ऐ वतन मेरे वतन' एक पीरियड ड्रामा आहे. या चित्रपटाचा टीजर जारी करण्यात आला आहे. चित्रपटात सारा अली खान (Sara Ali Khan) एका स्वातंत्रसेनानीच्या भूमिकेत असेल.
धर्माटिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन बॅनरअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. कन्नन अय्यर यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट सत्य घटनांशी प्रेरित एक थ्रीलर ड्रामा आहे. या चित्रपटाची कहाणी दरब फारूकी आणि कन्नन अय्यर यांनी लिहिलीय. 'ऐ वतन मेरे वतन' जगभरात २४० हून अधिक देश आणि क्षेत्रांमध्ये प्राईम मेंबर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
या चित्रपटाचा फर्स्ट-लूक व्हिडिओ लॉन्च झाला आहे, जो आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. या लूकमध्ये सारा अली खानची झलक दिसते. खादी साडी, कपाळावर टिकली असा साराचा लूक लक्षवेधी आहे.