पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ससुराल सिमर का' आणि 'कहाँ हम कहाँ तुम' फेम अभिनेत्री दीपिका कक्करने चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. दीपिका ( Dipika Kakar ) लवकरच आई बनणार असल्याची माहिती तिचा पती शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर दिली आहे. चाहत्यांकडून कपलवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
पती शोएब इब्राहिमने नुकतेच इंन्स्टाग्रामवर दोघांचा एका फोटो शेअर करून ही गुडन्यूज दिली. यात दीपिका आणि शोएब दोघेजण एका कठड्यावर पाठमोरे बसलेले दिसत आहेत. दोघांनीही व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी खास करून दोघांच्या व्हाईट रंगाच्या टोपीवर 'मॉम' आणि 'डॅड' असे असे इंग्रजी अक्षरात लिहिले आहे. यावरून दीपिका लवकरच आई होणार असल्याची महिती समोर आली आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थतेने भरलेल्या अंत: करणाने ही गुडन्यूज तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे ?, आमच्या जीवनातील हे सर्वात आनंदाचा क्षण आहे. होय आम्ही आमच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहोत!! लवकरच पालकत्व स्वीकारणार तयार आहे❤️❤️❤️ #alhamdulillah ?, तुमच्या प्रार्थना आणि प्रेम आमच्या चिमुकलीसाठी सदैव राही देत ❤️'. असे लिहिले आहे.
दीपिकाच्या या गुडन्यूजनंतर सोशल मीडियावर दोघांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका आणि शोएबची 'ससुराल सिमर का' या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले झाली होती. यानंतर त्याच्यात मैत्री झाली आणि नंतर दोघांनी २०१८ मध्ये लग्न बंधनात अडकले. तेव्हापासून दोघांच्या गुडन्यूजची चर्चा सोशल मीडियावर चर्चा पसरली होती. लग्नानंतर तब्बल ५ वर्षानंतर दोघेजण आई-बाबा होणार आहेत.
हेही वाचलंत का?