पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. कार्तिकचा 'भूल भुलैया २' हा गेल्या वर्षीचा सर्वात हिट चित्रपट ठरला होता. प्रेक्षकांनाही कार्तिकच्या या चित्रपटावर भरभरून प्रेम केलं. कार्तिकला त्याच्या यशाचं गुपित 'आप की अदालत' च्या भागात विचारण्यात आलं. यावेळी कार्तिकने यशाचे गुपित सांगत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांनी यशासाठी काही टिप्स दिल्याचे स्पष्ट केलं.
नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत कार्तिक याने ( Kartik Aaryan ) त्याच्या यशाबद्दल आणि आगामी प्रोजेक्टबद्दलच्या अनेक गोष्टीचा खुलासा केला. कार्तिकला 'भूल भुलैया २' चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले या यशाचे गुपित काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्याने सलमान खानचे नाव घेत त्यांनीच मला यशासाठी काही टिप्स दिल्याचे सांगितले.
'सर्वाचे चित्रपट हिट होतात आणि तुझाही हिट झाला तर मजा नाही, पण, सर्वाचे चित्रपट फ्लॉप झाले आणि तुझा एकटाचा चित्रपट हिट झाला तर मात्र, नवा इतिहास घडेल.' असे त्यांनी म्हटल्याचे कार्तिकने सागितले. कार्तिकच्या यशाचे रहस्य सलमान खान असल्याचे उघड झाले आहे. याच दरम्यान कार्तिक याने आपल्या जीवनातील काही मजेशीर किस्सेदेखील शेअर केले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबतच्या आगामी 'शेहजादा' चित्रपटात दिसणार आहे. यानंतर कार्तिक अनुराग बासू दिग्दर्शित 'आशिकी ३' या चित्रपटाचा भाग असणार आहे.
हेही वाचा :