2007 मध्ये 'जॉनी गद्दार' चित्रपटातून नील नितीन मुकेशने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो इतरही अनेक चित्रपटांत दिसला; पण त्याला म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही. पण तो वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत मात्र नेहमीच राहिला. शाहरूख खान आणि सैफ अली खानकडून जाहीर अपमान असो अथवा दीपिका पदुकोणच्या घराबाहेर 3 तास तिष्ठत उभे राहणे असो. 'लफंगे परिंदे' या चित्रपटात तो अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर रोमान्स करताना दिसला होता. यावेळी दीपिका आणि नीलमध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू होती. बी-टाऊनमध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. दोघेही डेट करत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अशातच 'लफंगे परिंदे' चित्रपटाच्या वेळी नीलने एक ट्विट केले होते. मी दीपिकाच्या घराच्या दरवाजाबाहेर तीन तास गुलाब घेऊन उभा होतो. नंतर माझ्या लक्षात आले की ती तर आरक्षणच्या प्रमोशनसाठी गेलेली असणार, असे नीलने ट्विट केले होते.