Sayali Sanjeev Saree : लाजून-लाजून मी लालच झाले बाई ❤️❤️; सायली पिंक साडीत मोहक

Sayali Sanjeev Saree
Sayali Sanjeev Saree
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev Saree) हिने छोट्या वाहिनीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने गौरी नावाची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तिने अनेक चित्रपट केले. याशिवाय ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आता तिचा मरून-पिंक साडीतील लूक व्हायरल झाला आहेत. सायलीच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री सायली संजीवने तिच्या इंन्स्टाग्रामवर मराठमोळा लूक शेअर केला असून तिने मरून- पिंक साडीत ( Sayali Sanjeev Saree ) एकदम ग्लॅमरस दिसतेय. यावर खास करून तिने जांभळ्या रंगाचे ब्लॉऊज परिधान केलं आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, केसांत पिवळ्या रंगाची फुले, कानात झुमके, कपाळावर टिकली, मेकअप आणि रेड लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोला तिने पिंक रंगाचा ईमोजी शेअर केला आहे. या फोटोली तिने किलर पोझ दिली असून तिचे लाजणे खुलून दिसतेय.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'लाज लाजुनी मी लालच झाले बाई ❤️❤️??', 'काय ती अदा… घायाळच झालो मी. ??', 'Beautiful…., Kya khoob lagti ho badi sundar dikhti ho ??', '❤️ very Pretty❤️Love you sweetheart❤️', 'Very hot and Beautiful, So cute ??', 'Gorgeous?❤', 'Cuteness overloaded ❤️❤️', 'कहर केलात मॅडम…??❤️?', 'अतिशय सुंदर तू दिसतेस ❤️❤️', 'आहा….खूप सुंदर ❤️❤️??', 'Glowing and growing!', 'Wow beautiful', 'Pettiness Overloaded ??', 'Behen yaaaaar ?', 'कोवळ्या उन्हात न्हाऊन, नखशिखांत तु नटलेली, जणु, सोज्वळ ती फुलराणी, ओली आताच फुललेली.??❤️', 'पलट..??❤️', 'Kevdhi goads❤️', 'Killer smile princess ??', 'Pink sariee hot ??'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला १ तासांत जवळपास १३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. सायलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तर ती 'शुभमंगल ऑनलाईन' ही मालिकेत दिसली होती. तर ती झिम्मा या सुपरहिट चित्रपटातूनदेखील चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news