पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेची चर्चा होतेय. कारण आहे – सोनी मराठीच्या आगामी "प्रतिशोध झुंज अस्तित्वाची" या मालिकेतील स्त्री पात्राची. (Amol Bawdekar) निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता अजून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. अभिनेते अमोल बावडेकर हे स्त्री पात्र साकारणार असून यामध्ये त्यांची ममता ही भूमिका आहे. अमोल बावडेकर यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. (Amol Bawdekar)
अमोल यांचा जन्म १ ऑक्टोबर, १९७३ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण चौगले हायस्कूल, बोरिवली येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे झाले.
अमोल बावडेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांत अभिनय केला आहे. अभिनयासोबतचं ते गाण्यातही निपुण आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा त्रयीं व्यासपीठांमधून त्यांनी आपले नाव उंचावले आहे. नाट्य क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे.
अमोल बावडेकर यांनी कट्यार काळजात घुसली, संत गोरा कुंभार, अवघा रंग एक झाला, ती फुलराणी अशा नाटकांमध्ये अभिनय केला आहे. संत गोरा कुंभार आणि अवघा रंग एक झाला या नाटकांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून किताब मिळाला आहे.
राधा ही बावरी, स्वामिनी, काशीबाई बाजीराव बल्लाळ, कृपासिंधू, कुंकू टिकली, छत्रपती शिवाजी, अहिल्याबाई होळकर, उंच माझा जोका अशा मालिका तर पांघरुण, बाजीराव मस्तानी, भाई : व्यक्ती की वल्ली, राजमाता जिजाऊ, ऋदयांतर, गोळाबेरीज यासारख्या चित्रपटांमधून ते झळकले आहेत.