पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर आनंद एल राय, तापसी पन्नू आणि कनिका ढिल्लन यांच्या मजेदार धमाकेनंतर हसीन दिलरुबा चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर लॉन्च केले आहे. निर्मात्यांनी तापसीच्या चाहत्यांची उत्सुकता संपवली आहे. या पोस्टरमधील तापसीच्या सेंशुअल लूकने चाहत्यांमध्ये उत्साह वाढवला आहे आणि ते अंदाज लावत आहे की, या चित्रपटाचे कथानक काय असेल? ताजमहालच्या पार्श्वभूमीवर, प्रेमाच्या प्रतिकासमोर ही अभिनेत्री बोल्ड अवतारात अतिशय सुंदर दिसत आहे.
कलर यलो प्रॉडक्शन, तापसी पन्नू, सह-निर्माता आणि लेखिका कनिका ढिल्लन यांच्यात मनमर्जियां आणि हसीन दिलरुबाच्या उत्कृष्ट यशानंतर हे तिसरे सिक्वेल आहे. निर्माता भूषण कुमार असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी ही कथा आहे.
सिक्वलसाठी, चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मैसी आणि सनी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट कनिका ढिल्लन यांनी लिहिला आणि सह-निर्मित केला आहे आणि जयप्रद देसाई यांनी दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार यांनी केली आहे. हा चित्रपट कलर यलो प्रोडक्शनचा आहे.