बिग बॉस मराठी : मीराचे एका मागोमाग वाद, आता आविष्कारशी भांडण

बिग बॉस मराठी : मीराचे एका मागोमाग वाद, आता आविष्कारशी भांडण
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी शोमध्ये पहिल्यादिवसापासून वादाला सुरुवात झालीय. जय दुधाणेसोबत भांडण झाल्यानंतर आता अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने आविष्कारसोबत वाद घातलाय. मला पहिल्या दिवसापासू त्रास देतोय, अशी भावना मीरा जगन्नाथ हिने व्यक्त केलीय. जय, स्नेहा वाघनंतर आता आविष्कारमध्ये वादाची ठिणगी पडेल.

आविष्कार मीराला सांगायचा प्रयत्न करतो. बाकीच्या सदस्यांनी जसं आवरलंय, तसं किमान आवरून ठेवावं. तसे करण्यास मीराने स्पष्ट नकार दिलाय. यावर ती म्हणाली. हे आताचं नाही. तर शोच्या पहिल्या दिवसापासून हा मला त्रास देतोय. मग, काय वाद आणखी चिघळला.

आविष्कार म्हणाला, 'पहिल्या दिवसाचे मला काही सांगू नकोस. प्रत्येक जण आपापलं स्वत:चं काम करतोय. बाकी साफसफाई करणं माझं काम आहे. तुला जर हे सर्व मुद्दामपणे करत असशील तर पुढे बघतो मी काय करायचंय ते!

यावर मीरा भडकली. ती म्हणाली, तुम्हाला कामे करायची असेल तर करा. नसेल जमणार तर तुम्ही मला नाही म्हणून सांगा. मी तशी तक्रार करेन. आता मी तक्रार करणारचं आहे. घरात पहिल्या दिवसापासून त्रास देतोय मला. रोज सकाळी उठून तेचं पाहायचं.

मीरा पुढे म्हणाली, पहिल्यांदा बेडरूम साफ करायची आणि मग किचन. मग का ऐकत नाही. मी नाही ना अडून बसले त्यावर. जर मी नडायला गेले ना, तर मग मी वाट लावेन. मी शांत आहे कारण ते दोन – दोन काम करत आहेत. आता यांचा वाद विकोपाला जातो की थांबतो हे पाहणं, औत्सुक्याचं ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news