पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) तिच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर 'शकुंतलम' ( Shankutalam ) हा चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटाच 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनची मुलगी आरहा बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण करत आहे. 'शकुंतलम' या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियवर रिलीज झाला आहे.
सामंथाचा Shankutalam हा चित्रपट कवी कालिदास यांच्या संस्कृत 'अभिज्ञान शाकुंतलम' या कांदबरीवर आधारित आहे. यात महाभारतातील शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता देव मोहन याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्यांदा शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्यातील प्रेमकथा असून नंतर शकुंतला दुर्वास ऋृषी यांच्या शापाने प्रेरित होती. यानंतर शकुंतलेचा वनवास सुरू होतो. वनवास संपल्यानंतर शकुंतला पुन्हा राजा दुष्यंतकडे येते मात्र, त्यावेळी तिचा स्वीकार करण्यात येत नाही.
युद्ध, निसर्ग, आकाश, राजमहाल, कैलास यासारख्या अनेक गोष्टी ट्रेलरमध्ये दाखविले आहे. या चित्रपटात सांमथा शकुंतलाची तर देव मोहन राजा दुष्यंतची मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. हा चित्रपटाचे दिग्दर्शक गुणशेखर हे आहेत.
सामंथा, देव मोहनसोबत या चित्रपटात अल्लू अर्हा, सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. एम. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला, जिशु सेनगुप्ता आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ( Samantha Ruth Prabhu )
हेही वाचलंत का?