पुढारी ऑनलाईन डेस्क : 'डॉक्टर डॉन' मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता शिंदे सध्या तिच्या नो ब्रा, नो ब्लाऊज या हटके लुकमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री श्वेता शिंदे हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने छान केशरी रंगाची पैठणी परिधान केली आहे. तिच्या या लुकमध्ये तिचा मराठमोळा साज पाहायला मिळत आहे.
तिच्या या हटके लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कारण, त्यामधील काही फोटोमध्ये तिने ब्लाऊज घातले नसल्याचे पाहायला मिळत आहेत. तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.
'नो ब्लाऊज,' अशी कमेंट एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर केली आहे. सध्या तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे अशी तिची ओळख आहे. श्वेता हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे.
'अवंतिका', 'अवाघाची हा संसार' आणि 'वादळवाट' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.