मुंबई, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवुडच्या शहनशाहने अर्थात अमिताभ बच्चन यांनी एका मराठी कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक करत, त्याच्यासमोर झुकत त्याचा सन्मान करणं, ही मराठी सिनेसृष्टीतील महत्वपूर्णच घटना म्हणावी लागेल. हा 'बीग-बी'चा सन्मान मिळालाय आपल्या मराठमोळ्या विनोदवीर समीर चौघुलेला (Samir Choughule). तो क्षण फक्त समीरसाठीच नाही, तर अख्ख्या मराठी सिनेसृष्टीत अभिमानाचा ठरला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', हा काॅमेडी शोमधून अख्ख्याला महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा समीर चौघुले आणि सर्व टीमला अमिताभला भेटण्याची संधी मिळाली.
'हास्यजत्रा'ची टीम अभिनेते अमिताभ बच्चन यांना नुकतीच भेटली. त्यावेळी अमिताभ टीमचं कौतुक करता म्हणाले की, "आप सब ये कैसे कर पाते हो? एक मिनिटमे इतका बडा लाफ्टर क्रिएट करना… बहोत बढीया…आप सब कमाल हो", अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी टीमचं कौतुक करत म्हणाले की, "मी हा कार्यक्रम न चुकता पाहतो.
समीर भावनिक होऊन सांगतो…
या भेटीवेळी अमिताभ बच्चन यांनी समीरच्या विनोदाच्या टायमिंचं विशेष कौतुक करत अक्षरश: त्याच्यासमोर अमिताभ बच्चन झुकले. या प्रसंगाबद्दल समीर चौघुले सांगतो की, "तोक्षण. आयुष्यभर काळजाच्या कुपीत साठवून ठेवण्याचा. मेंदूत त्या क्षणाची पर्मनंट 'एफडी' करून ठेवण्याचा. खूप वेळ भारावून जाण्याचा."
"तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हे काल सिद्ध झालं. काल सोनी मराठीचे हेड अजय जी भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड अमित फाळके यांच्या सहयोगामुळे आम्हा कलाकारांचे स्वप्न पूर्ण झालं."
"महानायक श्री अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ही भेट आमच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'मुळे झाली याचं आम्हाला सर्वांनाच अत्यंतिक समाधान आहे. बच्चनसर हास्यजत्रा नियमित बघतात आणि खूप एन्जोय करतात हे त्यांच्याकडून ऐकण हे केवळ स्वप्नवत होतं."
"बच्चनसरांसमोर असूनही दिसत नव्हते. कारण डोळ्यात साचलेल्या आसवांनी दृष्टीला थिजवल होतं. आसवं ही वेडी 'वाहणं' हा गुणधर्म विसरून साचून बघत राहिली होती", अशा भावनिक शब्दांत समीरने (samir choughule) सोशल मीडियावर या प्रसंगासंदर्भात पोस्ट लिहिली.
पहा व्हिडीओ : अलका कुबल-आठल्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पुढारीची टिम भेटीला..!
हे ही वाचा