अनन्या बिर्ला हिचा 'व्हेन आय एम अलोन' व्हिडिओ पाहिला का? | पुढारी

अनन्या बिर्ला हिचा 'व्हेन आय एम अलोन' व्हिडिओ पाहिला का?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गायिका आणि संगीतकार, अनन्या बिर्ला हिचा ‘व्हेन आय एम अलोन’ व्हिडिओ रिलीज झालाय. अनन्या बिर्ला हिचा ‘हिंदुस्तानी वे’च्या भारी यशानंतर ट्रॅक ‘व्हेन आय एम अलोन’ म्युझिक व्हिडिओ रिलीज केलाय. ‘हिंदुस्तानी वे’च्या लोकप्रियतेनंतर हा तिचा नवा प्रोजेक्ट आहे. संगीतकार ए आर रहमान यांच्यासोबतचे तिचे पहिले योगदान होते.

आज जग काेराेना महामारीमुळे प्रचंड नैराश्याच्या गर्तेतून जात आहे. ‘व्हेन आय एम अलोन’मध्ये हे दाखवण्यात आले आहे. आयुष्यात गोष्टी कशा आकार घेतात? कशा त्यातल्या काही गोष्टी आपोआप गळून पडतात, हे दाखवण्यात आले आहे.

हा व्हिडीओ स्वतः अनन्याने दिग्दर्शित केला असून स्वतःच्या आयुष्यातील जसे आहेत तसे, क्षणांना यात चित्रित केले आहेत.

अनन्या गाण्याविषयी म्हणते की, व्हेन आय एम अलोनमध्ये माझ्याविषयी जेवढे होऊ शकेल. तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की माझा जन्म कुठे झाला.

मी पहिल्यांदा डेटवर कुठे गेले होते. अशा अनेक गोष्टी, ज्यांनी माझे स्वत्व न हरवता मला आकार दिला आहे.

मी या म्युझिक व्हिडिओबाबत खरोखरच खूप उत्साहित आहे. हा व्हिडीओ सर्वांना दाखवण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ-When I’m Alone – Official Video – Ananya Birla

Back to top button