रणवीरने सिद्धार्थला मागून दिला धक्का | पुढारी

रणवीरने सिद्धार्थला मागून दिला धक्का

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धार्थ जाधव सध्या त्यांच्या ‘सर्कस’ चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या दोघांमधील मैत्री तर जगजाहीर आहे. सिद्धार्थ आणि रणवीर यांनी रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर आता ते पुन्हा ‘सर्कस’ या चित्रपटात पुन्हा झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे नुकतीच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. सिद्धार्थ-रणवीरच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत रणवीर मागून येऊन सिद्धार्थला धक्का देताना दिसत आहे. सिद्धार्थ पुढे चालताना दिसत आहे. रणवीर त्याच्या मागून येतो. सिद्धार्थ तिथेच कोणाशीतरी बोलत असताना मागून आलेला रणवीर त्याला धक्का मारतो आणि त्यानंतर दोघंही एकमेकांशी हसत हसत गळाभेट घेताना दिसतात.

Back to top button